पंढरपूर येथे युवा सेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
पंढरपूर/प्रतिनिधी
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ साली झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. गेली काही वर्षांपासून राज्यात शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असल्यामुळे शिवसेनेला एक वेगळे स्थान आहे.
शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे शिवसेना युवा सेना यांच्या वतीने विविध कार्यक्रमाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी पंढरपूर येथील श्रीराम कृष्ण हरी वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्ठांन भोजन व अल्पोहार देण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर संघटक वैभव फसलकर,युवा सेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे, युवा सेना शहर संघटक सनी असंगे, युवा सेना शहर उपप्रमुख गणेश चव्हाण, युवा सेना शहर उपप्रमुख आनंद शिंदे, आकाश चौगुले, शाबास शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.