महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत श्री अंबिकादेवीचे दर्शन घेऊन दिपकआबा प्रचाराचा नारळ फोडणार
सांगोला /प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. सांगोला शहरातील श्री अंबिका देवीचे दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील हे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्याचवेळी उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या हातात विजयाची मशाल दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवीचे दर्शन घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अरविंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ.धनंजय पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.