महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंगळवेढा येथे जाहीर सभा संपन्न
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन मंगळवेढा येथे करण्यात आले होते.
यावेळी व्याव्यासपीठावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपा, महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विना देऊन वारकऱ्यांची पगडी आणि तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की ही निवडणूक उमेदवारांचं भविष्य ठरवणारी नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी आहे.
महायुती सरकारच्या काळात राज्यात सर्वच क्षेत्रात विकासकामे झाली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्याचे काम होत आहे. या मतदारसंघातील जनता विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना बहुमताने विजयी करतील असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना समाधान आवताडे म्हणाले की आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन महायुतीच्या मागे सक्षमपणे उभं राहिलं तरच आपल्याला अजून मोठ्या विकासाचा पल्ला गाठता येईल. आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास हाच प्रामाणिक ध्यास समोर ठेऊन संपूर्ण मतदारसंघातील जनतेने महायुतीसोबत उभे राहून हा विकासाचा प्रवास अधिक मजबूत केला पाहिजे अशी अपेक्षा समाधान अवताडे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी भाजप महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावातील सरपंच पदाधिकारी व मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.