महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना भरघोस मतांनी निवडून द्या; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पंढरपुरात नागरिकांना आवाहन
पंढरपूर/प्रतिनिधी
येत्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मतदारांना आता सत्ता बदलण्याची संधी आली आहे. येत्या वीस तारखेला तुतारी च्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर येथील प्रचार सभेत मतदारांना केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, लक्ष्मण ढोबळे सर, सुभाष भोसले, संदीप माडवे, सुधीर भोसले, संतोष नेहतराव, सुधीर अभंगराव, प्रताप गंगेकर, वसंतनाना देशमुख, अमर सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यातील ३४ गावाला पाणी मिळावे म्हणून आमच्या सरकारच्या राजवटी मध्ये आमदार भालके यांनी केलेल्या प्रयत्नाला आम्ही दुजोरा देऊन या मंगळवेढा तालुक्यातील गावाना मंजूरी व निधी दिला. याचे क्रेडीट विरोधक घेत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला कोट्यावधीचा निधी आम्ही दिला. या पुढील काळात अनिल सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अनिल सावंत यांना विजयी करा. या मतदार संघातील सर्व विकास कामे पूर्ण केली जातील.
भाजपा देशामध्ये हिंदू मुस्लीम यांच्या मध्ये वैरत्वाची भावना वाढीचे काम करीत आहेत. बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा भाजपाच्या एका मुख्यमंत्री ने केली. अशा घोषणा म्हणजे देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे आहे. जुडेंगे तो आगे बढेंगे ही घोषणा आमची आहे. सर्वधर्म समभाव ही आपल्या देशाच्या घटनेमध्ये लिहले आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविदाने रहावे ही संकल्पना आपल्या देशाची आहे. असे असताना भाजपा देशातील जनतेमध्ये दुही निर्माण करु पहात आहे. अशा लोकांना मतदानाच्या रुपाने सत्तेतून दूर केले पाहिजे. आता या लोकांना दूर करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे. तुतारी चिन्हा समोरील बटन दाबून अनिल सावंत यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना त्यांनी केले. यावेळी हजारोच्या संख्येने जनसामान्य मतदार, महिला या उपस्थित होत्या.