लोकनायक/प्रतिनिधी
शिक्षकांना शंभर टक्के अनुदान आणि इतर मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बैठक घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मोहोळचे आ. यशवंत माने यांनी दिली. ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेबभालशंकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी शासकीय विश्रामगृहात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे उपस्थित होते.टप्पा अनुदान वरील प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना सरसकट शंभर टक्के अनुदान मिळावे. सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी पदाचा वनवास संपावा, अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्यां प्रलंबित प्रस्तावांना मान्यता मिळावी, अधिसंख्य
पदाबाबत दि. १४/०२/२०२४ च्या शासन निर्णया नुसार नियुक्तीस मान्यता मिळावी. या व इतर मागण्यां संदर्भात आ. यशवंत माने यांच्यासमवेत चर्चा झाली.
या शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा खजिनदार – दाऊत आतार, संघटक सिध्देश्वर भुरले, उत्तर सोलापुर तालुका
अध्यक्ष सतीश गायकवाड, संतोष वाघमारे, सुभाष गायकवाड, युवराज सरवदे, अंगद गायकवाड आदी पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.