विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पंढरपुरात १४ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान सोहळा
पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने १३३ व्या जयंती महोत्सवानिमित्त जयंती समितीच्या वतीने रविवार दि.१४ एप्रिल २०२४ रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहराचे नावलौकिक केल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे तरी नमूद करण्यात आलेल्या पुरस्कारासाठी मान्यवरांनी प्रतिष्ठानकडे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक डि. राज सर्वगोड यांनी केलेले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे सर, जयंती समिती अध्यक्षा वंदनाताई कसबे, सचिव सोहन जैस्वाल, विलास जगधने सर, नितीन काळे, आदम बागवान, आण्णा धोत्रे, विनोद धुमाळ,ज्ञानेश्वर कांबळे सर,डी.बी.कांबळे,शरीफा पठाण,नूरजहाँ फकीर,अजिंक्य देवमारे, रिहाना आत्तार, राबिया टिनमेकर, रोहीत जाधव, प्रथमेश सर्वगोड, प्रतिक कुंभार आदि उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २७ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये १) प्रबुध्द विधिज्ञ’ पुरस्कार २) महर्षि वाल्मिकी शौर्यरत्न’ पुरस्कार, ३) वर्धमान महावीर अहिंसारत्न’ पुरस्कार ४) राष्ट्रसंत रोहिदास महाराज प्रबोधनरत्न’ पुरस्कार ५) छत्रपती शिवाजी महाराज प्रशासनरत्न’ पुरस्कार ६) राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्योगरत्न’ पुरस्कार ७) महात्मा बसवेश्वर समाजभूषण’ पुरस्कार ८) राष्ट्रपिता महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार ९) क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले शिक्षणभूषण’ पुरस्कार १०) राष्ट्रसंत गाडगे महाराज शिक्षणरत्न’ पुरस्कार ११) नारायण मेघाजी लोखंडे कामगाररत्न’ पुरस्कार १२) डॉ. सी. के. बोले वैद्यकीयरत्न’ पुरस्कार १३) राजश्री शाहू महाराज क्रिडारत्न’ पुरस्कार १४) विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) १५) विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) १६) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) १७) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) १८) साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ पुरस्कार १९) महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न’ पुरस्कार २०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’ पुरस्कार २१) भारतरत्न मोक्षगुंडम सर विषेश्वरय्या स्थापत्यरत्न’ पुरस्कार २२) भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान रत्न’ पुरस्कार २३) राजमाता जिजाऊ आदर्शमाता’ पुरस्कार २४) माता रमाई आदर्श पत्नी’ पुरस्कार २५) विर शिवा काशीद वीररत्न’ पुरस्कार २६) कर्मवीर भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार २७) गौतम राजाध्यक्ष फोटोग्राफररत्न’ पुरस्कार,२८ ) उत्कृष्ट कृतिशील महिला बचत गट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तरी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या मान्यवरांनी आपले प्रस्ताव ५ एप्रिल २०२४ पर्यंत शिवशंभो मोबाईल शॉपी, जिजामाता शॉपिंग सेंटर शहा पेट्रोल पंपासमोर, पंढरपूर जि. सोलापूर पत्त्यावर पाठविण्यात यावेत व मोबा. ९४२३३३५१००, ९१३०२५७४२९, ८७६६५८३४४१, ९१६९९९१४१४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेले आहे.