नगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी
पंढरपूर/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आज पंढरपुरात दाखल होत आहेत.
त्यांची सभा पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवतीर्थ येथे होणार आहे.
याबाबत पंढरपूर वंचित बहुजन आघाडीने नगरपालिका प्रशासनाकडे शिवतीर्थ परिसरातील अतिक्रमण हटवावे आणि स्वच्छता करावी याबाबत पत्र दिले होते.
मात्र एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर पंढरपुरात दाखल होऊनही कोणत्याही प्रकारची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने केली नसल्याने सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर नगरपालिकेचा निषेध करत संताप व्यक्त करत नगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, महिला तालुकाध्यक्षा लक्ष्मी नवगिरे, शहर युवक अध्यक्ष दिनेश वाघमारे, तालुका संघटक युवराज सरवदे, तालुका महासचिव सुनिता खलसे, उपस्थित होते.