जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फर्त प्रतिसाद
पंढरपूर/प्रतिनिधी
युवक नेते भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात शुक्रवारी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून बिरोबा देवाला नारळ फोडून करण्यात आली.तत्पूर्वी त्यांनी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
यानंतर त्यांनी हुन्नूर, ममदाबाद, लोणारवाडी, पडळकरवाडी, रवेवाडी, मानेवाडी या गावांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.विविध ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत आणि फटाक्याची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी नागरिकांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर मांडला.याबाबत भगीरथ भालके यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांचे माध्यमातून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात युवक नेते भगीरथ भालके यांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे.
14 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान हि जन आशीर्वाद यात्रा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन भगीरथ भालके हे या यात्रेच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधणार आहेत.