पंढरपूर/प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून पंढरपुरात भालके गटाची धुरात सांभाळणारे भालके गटाचे कट्टर समर्थक सुमित शिंदे यांनी वाढदिवसाचा मुहूर्त साधत संजय आवताडे यांच्या उपस्थितीत आवताडे गटात प्रवेश केला.
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे निकटवर्ती मानले जाणारे सुमित शिंदे यांनी भालके गटाची कायम धुरा सांभाळण्याचे काम केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष व सध्याचे पंढरपूर युवा सेना शहरप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
पंढरपूर शहरात मोठा जनसंपर्क ठेवून असलेल्या समिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भालके गटाला धक्का देत आमदार अवताडे गटात प्रवेश केल्याने अवताडे गटाची ताकद वाढली आहे.
कमी कालावधीत जनतेच्या कामाला प्राधान्य देऊन मतदार संघासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणारे एकमेव आमदार ठरलेले आमदार समाधान आवताडे यांच्यावर जनते बरोबरच नेत्यांचाही विश्वास वाढू लागला आहे .
भालके गटाचे कट्टर समर्थक असलेले सुमित शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर विश्वास ठेवून आवताडे गटात प्रवेश केला. यावरूनच आमदार समाधान आवताडे यांच्यावरील जनतेबरोबरच नेत्यांचाही विश्वास वाढू लागल्याचे दिसून येत आहे.