पंढरीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : आ.समाधान आवताडे
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा चबुतरा उभारण्याचे भूमिपूजन आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युवक नेते भगीरथ भालके, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, युवक नेते प्रणव परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत येथील
श्री विठ्ठल मंदिर समिती भक्तनिवास शेजारी,भक्ती मार्ग रोड येथील नियोजित जागेवर संपन्न झाले.
यावेळी पुतळा समिती अध्यक्ष मा. नगरसेवक नागेश यादव, उपाध्यक्ष दलित मित्र नानासाहेब वाघमारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पंढरपूर शहरात झाला पाहिजे
अशी भावना बहुजन समाजात आहे. यासाठी पुतळा समिती आणि समाजातील ज्येष्ठ नेते मंडळींनी पाठपुरावा केला आहे. पुढील काळात लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा भरण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. असा विश्वास उपस्थित समाज बांधवांना दिला.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, युवक नेते भगीरथ भालके, विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, आरपीआयचे नेते सुनिल सर्वगोड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नानासाहेब वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केलेल्या नेतेमंडळींचे तसेच विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी त्यांनी स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी पुतळा उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देत पुतळा उपलब्ध करून दिल्याबद्दल भालके कुटुंबीयांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर नगरपरिषद आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर अध्यक्ष नागेशभाऊ यादव, उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी दलित मित्र दुर्योधन यादव,ऍड. किशोर खिलारे, ऍड. बादल यादव, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, अंबादास वायदंडे, महेश साठे, दशरथ कांबळे, उमेश पवार,बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ देवकुळे, धनंजय वाघमारे,भोला साठे, धनंजय खिलारे,पंढरीनाथ कदम,दशरथ यादव, सागर कांबळे,दिनेश साठे, सत्यवान यादव, मिलन यादव,नाथा यादव, लहू रणदिवे,भास्कर कांबळे,खंडू कांबळे, प्रदीप यादव,लखन खिलारे,लोकेश यादव उपस्थित होते.
Post Views: 130