जनता पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा
सोलापूर / प्रतिनिधी
पक्षाच्या पूर्वजांनी केलेल्या कष्ट आणि त्यागामुळे भारतीय जनता पक्ष आज मोठा झाला आहे. भाजपा हा समाजातील अंतिम घटकाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केले. भाजपचा स्थापना दिन शनिवारी पक्ष कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजप व महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपाचे लोकसभा निवडणुक प्रमुख विक्रम देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू,
माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल उपस्थित होते.
शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, आज भारतीय जनता पार्टीला मोठे यश सर्वत्र मिळत आहे. देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी जनता उत्सुक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ स्तरापर्यंत जाऊन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा जोरदार प्रचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. प्रत्येक बुथवर किमान ५१ टक्के मते मिळावी त्यासाठी प्रयत्न करावेत.
भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, पूर्व कार्यकर्त्यांच्या कष्ट, संघर्ष आणि त्यागातून उभे राहिलेले भाजपाचे देशव्यापी संघटन आहे. सामान्य कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भाजपा स्थापनेपासून प्रयत्नशील आहे. अनेक संघर्षानंतर आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला आहे. कार्यकर्ता निर्माण हे उद्दिष्ट ठेवून विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी अशा अनेकांनी कष्टाने हा पक्ष उभा केला आहे. त्याग, तप आणि संघर्षाचा भगवा सर्वत्र नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोलापुरातून कमळाचे फुल मोदींना भेट द्यावे, असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केले. भाजपाचे शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास रामेश्वरी बिरू, उपाध्यक्ष जय साळुंखे, श्रीनिवास करली, डॉ. राजेश अनगिरे, चिटणीस बजरंग कुलकर्णी, सुनिल गौडगांव, लक्ष्मणराव गायकवाड, अंबादास बिंगी, बाशाभाई शेख, मंडल अध्यक्ष गिरीष बत्तुल, कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, बसवराज गदंगे
आदी उपस्थित होते.