पंढरपूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दुपारी १.३०वाजता युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक तसेच मोजक्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसमवेत भरणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.
विद्यमान आ समाधान आवताडे यांचे सासरे बाळासाहेब श्रीहरी नाडे यांचे परवा निधन झाल्याने आ आवताडे यांचा कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन अथवा रॅली न करता साध्या पद्धतीने अर्ज भरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आ आवताडे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागल्याने भारतीय जनता पार्टी व महायुतीने त्यांना या मतदारसंघात दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नियोजित निवडणूकी साठी ते आपला उमेदवारी अर्ज पंढरपूर येथे संबंधित निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणार आहेत. त्यामुळे भाजपा व महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात तसेच गावात मतदारांशी संपर्क ठेवून आ आवताडे यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून देण्याचे आवाहन करण्याच्या अनुषंगाने प्रचार करावा असे जाहीर करण्यात आले आहे.