राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील मौजे भैरवनाथवाडी, नारायण चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे महावीरनाना देशमुख मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी पांडुरंग सहकारी कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव धनवडे, सरपंच बाप्पा धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, माजी सरपंच नाना माने, माजी सरपंच पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक , कार्यकर्ते हेल्थ कंपनीचे कुंभार साहेब उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.