शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या पुढाकाराने पंढरपुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर/प्रतिनिधी
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील पालवी येथील बालकांना मिष्ठांना भोजन व पंढरपूर येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संजय बंदपट्टे म्हणाले की राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी गावोगावी आरोग्य केंद्र उभारून तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे.
त्यांना जनतेच्या सेवेसाठी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय बंदपट्टे मित्रपरिवार व एस.बी ग्रुप १५५५ चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.