तिर्हे येथे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची प्रचार सभा
सोलापूर /प्रतिनिधी
माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी आपणा सर्वांची साथ मला हवी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे गाव भेट दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. ही लोकसभा निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकर्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान केला. हर घर जल मार्ङ्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना असून, मुद्रा योजनेतून ग्रामीण भागातील तरुणांना शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. देशाच्या विकासासाठी सोलापूरच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी भाजपच्या मागे उभे रहावे.
आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले की, 2014 नंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर चालत आहे. या कार्यकाळात प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदार संघात नव्याने निर्माण झालेल्या रस्त्यांमुळे भाजीपाला, दूध व्यवसायांना शहर जवळ झाले असून हा शेतीपूरक व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदीकाठच्या लोकांना बंधार्यांच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होत आहेत. आगामी काळातही दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा असाच विकास व्हावा यासाठी राम सातपुते यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवावे.
यावेळी उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा सचिव यतीन शहा, सरचिटणीस संग्राम पाटील, धनाजी घोडके, चिमन साठे,सर्जेराव पाटील, विशाल जाधव, समाधान गायकवाड, प्रताप मल्लाव, शशिकांत पवार, महेश पवार, गणेश पवार, संजय शिंदे , रावसाहेब गायकवाड, गोपाळ सुरवसे, महिला अध्यक्षा -रुशालीताई पवार, उपाध्यक्ष स्वाती पवार, उपस्थित होते.