पक्षाकडून संधी मिळाल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार : जयश्रीताई खरात
पंढरपूर/प्रतिनिधी
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा गोंधळ उडाल्याने आगामी निवडणुकीत ओरिजिनल अनुसूचित जाती मधील उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तर दुसरीकडे भाजपाकडून पंढरपूर येथील स्थानिक महिला उमेदवार म्हणून मा. नगरसेविका, मुंबई अ.जा भाजपा सचिव जयश्रीताई खरात यांनी निवडणूक लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत खरात यांच्याशी संपर्क साधला असता पक्षातील केलेले कार्य तसेच महिला आणि स्थानिक उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा, राज्यातील भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मला सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात संधी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
याबाबत सोलापूर लोकसभा क्षेत्रातील सर्व भाजपाचे पदाधिकारी,आमदार, नेते मंडळींशी संपर्क साधला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
मूळच्या पंढरपूरच्या असलेल्या जयश्री खरात यांनी गेली तीस वर्षांपासून मुंबई येथे शाखा अध्यक्ष ते राज्य लेवल पर्यंत भारतीय जनता पार्टीचे जोमाने कार्य केले आहे.मुंबई महानगरपालिकेचे महिला बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणून मुंबईचा कारभार हताळला आहे.यावेळी स्व. मा.आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूरची सून झाली मुंबईची नगरसेविका असे उद्गार काढत सन्मानहि केला होता. परिचारक घराण्याशी असलेले सलोख्याचे संबंध आणि पक्षातील कार्य
यामुळे एकंदरीतच महिला उमेदवार म्हणून खरात यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे निवडणुकीचे धोरण ठरले असून कमळ चिन्ह हाच उमेदवार समजून निवडून द्यावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आल्याने आणि लोकसभेतील बहुमत पाहता भाजपाकडून पक्षात सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्याला सोलापूर राखीव लोकसभेची उमेदवारी मिळणार हे मात्र नक्की!