पंढरपूर/प्रतिनिधी
आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने युवक नेते भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. गोरगरिबांची सेवा हाच आमचा धर्म हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
पांडुरंग हा गोरगरीबांचा देव म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात या येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपूर नगर परिषदेच्या समोर करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेशभैय्या तोंडसे, सचिव निहालभाऊ भोरे, अनुप कसबे,विजय अर्जुन पवार,
सदस्य ऐश्वर्या गुरव,शुभम इटकर, सुजत तोंडसे,हर्षल तोंडसे, राहुल भोरे,नारायण छापछडी, ऋतुराज धोत्रे,गणेश नलवडे, गणेश काळे, अभिजीत भोरे,संध्या परदेशी ,गणेश महाराज जाधव उपस्थित होते.