पंढरपूर/प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. बुधवारी मोहोळ मध्यवर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मोहोळ शिवसेना नेते व उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीखाली मिरवणुकीचा नारळ फोडून मिरवणुकीस सुरुवात झाली,तत्पुर्वी त्यांनी मोहोळ शहरांमध्ये असलेल्या बुद्धविहार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्मारकाचे दर्शन घेतले त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मोहोळ शहरातील मंडळांनी राजू खरे यांचा यथोचित सन्मानाचा फेटा घालत सत्कार करण्यात आला,त्यानंतर मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी हजारो आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मिरवणूक मुख्य मार्गाने मार्गस्थ होत ढोल ताश्यांच्या गजरात तरुणांनी ताल धरला असताना राजू खरे यांनाही जयंतीचा मोह न आवरल्याने त्यांनीही तरुणांच्या गर्दीत मिरवणुकीत सहभागी होत गाण्याच्या तालावर ठेका धरत बेधुंद नाचत राहिले.त्यामुळे राजू खरे यांचा कुठल्याही प्रकारचा गर्व न करता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून आल्याने तसेच आपुलकीचे वाटून राहिले त्यामुळे त्यांच्या नावाची संपूर्ण मोहोळ शहरांमध्ये एकच चर्चा सुरू असल्याची पहावयास मिळाले.