अभिजीत पाटील यांचा पंढरपूर तालुक्यातील 42 गावात प्रचाराचा झंजावात
पंढरपूर/प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी खेळ भाळवणी, शेळवे, भंडीशेगाव, उपरी यासह ४२ गावातील विविध गावांमध्ये घोंगडी बैठका घेऊन कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साह वाढवून मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यामध्ये पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळेल तसेच पंढरपूर पर्यटन धार्मिक पर्यटन वाढीस मदत मिळणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी या गाव भेट दौऱ्या दरम्यान सांगितले.
अभिजीत पाटील यांच्या या झंजावाची प्रचार दौऱ्यामुळे दोन्हीही मतदार संघात महायुतीचे बळ वाढले असून याचा फायदा महायुतीचे माढा लोकसभेचे उमेदवार उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने काही दिवसापूर्वी कारवाई केली होती. या कारखान्याचे तीन गोडाऊन सील करण्यात आले होती.
या कारवाईमुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. यादरम्यान चेअरमन अभिजीत पाटील यांनी स्वतःला घाण ठेवेन पण विठ्ठल कारखान्याला काहीही होऊ देणार नाही असा विश्वास शेतकऱ्यांना दिला होता.
यानंतर त्यांनी सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली होती.
यानंतर चेअरमन अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर समर्थकांची बैठक घेऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
यानंतर शुक्रवारी कारखान्यावरील करण्यात आलेली कारवाई बँकेने मागे घेत कारखान्याचे गोडाऊन उघडण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी समाधान व्यक्त केले.
अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने याचा फायदा माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदार संघात होणार असून महायुतीच्या उमेदवारांना मोठे पाठबळ मिळणार आहे.