सोलापूर शहरातील डॉक्टर्स यांच्यासोबत पालकमंत्री पाटील यांनी साधला संवाद : जाणून घेतल्या समस्या
सोलापूर / प्रतिनिधी
देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात. मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण नरेंद्र मोदीच करू शकतात. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करू. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील बैठकीदरम्यान डॉक्टरांना दिली.
सदरची बैठक भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. या बैठकीस डॉक्टरांनी आपल्या समस्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी या बैठकीस मोहन डांगरे, डॉ. रविराज गायकवाड, डॉ. सारडा, डॉ. सचिन बोंगलीकर, डॉ. नितीन बलवान, डॉ. जिद्दीमनी, डॉ. चंदन रवा, डॉ. श्रीनिवास पिंडीपोल, डॉ. सुनील काटे, डॉ. राजेश फडकुले यांच्यासह सोलापूर शहरातील हॉस्पिटलचे डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डॉक्टरांच्या आणि अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी श्रीनिवास संगा यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळी वातावरणात ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील डॉक्टर्स संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.