पंढरपूर/प्रतिनिधी
लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक विद्यमान खासदारांना भाजपा नारळ देण्याच्या तयारीत आहेत.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पंढरपूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावल्यानंतर पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साध.
यावेळी बोलताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली असल्याचे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की राज्यभरात असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे जोमाने कार्य केल्याने याची दखल घेऊन संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी त्यांनी देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे. भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच समान नागरी कायदा आणण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला.
बोगस जात प्रमाणपत्राचा वापर होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तम जानकर उमेदवारी मिळवण्यासाठी काहीही करू शकतात म्हणत खास शैलीतून जानकर यांच्यावर टीका केली. याचबरोबर काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला.