मागील काही महिन्यांपासून मोहोळ शहर व तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
यावर उपाय म्हणून उद्योजक समाजसेवक राजू खरे यांनी मोफत पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि
गेली काही दिवसांपासून जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून राजू खरे यांच्या प्रेरणेतून मोहोळ शहर व तालुक्यात मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
यामध्ये येथील नागरिकांनी मागेल तेवढे पाणी देण्याचे काम राजू खरे यांच्या वतीने केले जात असल्याने दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा म्हणून राजू खरे यांच्याकडे लोक आशेने पाहू लागले आहेत.
मागील काही महिन्यांपासून राजू खरे यांनी कोणतेही पद प्रतिष्ठा नसतानाही या तालुक्यात सामाजिक बांधिलकी म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीला लाजवेल असे काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी या भागातील रस्ते, वीज, पाणी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर शैक्षणिक क्षेत्राला भरीवाशी मदत केली आहे.
सध्या या तालुक्यात भीषण असा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांवर आलेल्या यात्रेमुळे येणाऱ्या भाविकांची आणि नातेवाईकांची संख्या पाहता ही पाण्याची भीषण टंचाई भासू लागली होती.
यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन राजू खरे यांनी मोहोळ शहर व तालुक्यात मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
यामुळे राजू खरे यांचे सर्वत्र आभार मानले जात असून ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.