पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व अनिल सावंत यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निवासी मूकबधिर शाळा, गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम, पंढरपूर येथील राम कृष्ण हरी वृद्धाश्रम याचे बरोबर पालवी संस्था या सर्व ठिकाणी मिष्ठांन भोजन देण्यात आले. तर सायंकाळी
ज्येष्ठ नागरिक, कर्तृत्ववान महिला, यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व पुरस्कार सन्मान सोहळा पंढरपूर येथील मोरारजी कानजी धर्मशाळा कार्यालय स्टेशन रोड येथे संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक, कर्तृत्ववान महिला आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, माजी नगरसेवक संतोष नेहतराव, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, सागर पडगळ, अमर सूर्यवंशी, माजी नगरसेवक अक्षय गंगेकर, बाळासाहेब नेहतराव, सामाजिक कार्यकर्ते संतोष सर्वगोड,रवी सर्वगोड, अमित कसबे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.