पंढरपूर लोकनायक / प्रतिनिधी
नुकतेच देशाच्या पंतप्रधानांनी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे. शंभर दिवस अखंड पणे प्रयत्न करा आणि उमेदवार कोण आहे? कसा आहे. याच्याकडे न पाहता फक्त कमळाचे फुल हे चिन्ह पाहून त्या उमेदवाराला निवडून द्या. असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
आज पर्यंत भाजप हा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा परंतु भाजपा मध्ये आज’आयाराम गयाराम’ यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते मागे पडू लागले की काय? असे चित्र दिसून येत आहे. काही निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता या निष्ठावंतांच्या बोलण्यामधून समजले यापूर्वी देखील आम्ही नेतेमंडळींच्या पाली उचलत होतो.
आम्हाला आज संधी मिळेल. उद्या संधी मिळेल या आशेने आम्ही कार्य करीत राहिलो.
परंतू आता या ‘आयाराम गयाराम’ नेते मंडळींच्या देखील आता पाला उचलायला लागणार की काय? अजून किती दिवस अशा पाली उचलायच्या? भाजपा निष्ठावंतांचा पक्ष म्हणून समजला जातो. परंतु आज काँग्रेस आणि भाजपा मध्ये काय फरक राहिला आहे? असा प्रश्न देखील निष्ठावंत कार्यकर्ते आज उपस्थित करताना दिसत आहेत.
भाजपा सरकार आता असे न म्हणता मोदी सरकार म्हंटले जाते. या सरकारने आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती युवा,महिला,गरीब व शेतकरी या वर्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती घरोघरी जाऊन पोहोचवावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. तसेच नव्याने मतदार होऊ पाहणाऱ्या युवकांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती देऊन भाजपा सरकारला निवडून देण्यासाठी मत आणि मन परिवर्तन करण्याचे देखील आवाहन केले आहे.
आज सर्वत्र भाजपाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते नेते म्हणून प्रस्थापित झाले आहेत. अशा नेत्यांना देखील आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही? अशी अवस्था या निष्ठावंत नेते मंडळांचीहि झाल्याची दिसून येत आहे. अजून किती दिवस वेगवेगळ्या पक्षातून भाजपा मध्ये सामील झालेल्या नेतेमंडळींच्या पाली उचलायच्या ? असा प्रश्न आज निष्ठावंत कार्यकर्ते विचारु लागले आहे.
काही भ्रष्ट लोकांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे कोणत्या तोंडाने आम्ही त्या उमेदवाराचा प्रचार करायचा? हा प्रश्न देखील या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेडसावू लागला आहे.
यामुळे पुढील काळात वरिष्ठ नेतेमंडळींकडून निष्ठावंतांना संधी देऊन न्याय दिला जाईल अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.