पंढरपूर / प्रतिनिधी
सध्या संपूर्ण राज्यामध्ये अठरा वर्षे पूर्ण करणारे युवक युवती तरुण मतदार आपल्या लोकशाहीतील मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदान कसे करावे. याची माहिती सरकार सर्वत्र गावोगावी ईव्हीएम मशीनच्या द्वारे मतदान कसे करावे याचे महत्व सांगितले जात आहे.
परंतु ईव्हीएम या मशीनला संपूर्ण जगभरामधून दूर केलेले असताना आपल्या देशामध्ये ईव्हीएम च्या मशीनच्या द्वारे मतदान केले जाते या ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवणारे असंख्य लोक आपल्या भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ही ईव्हीएम मशीन बंद करावे. व पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर मतदान घेतले जावे. अशी मागणी करताना दिसून येत आहेत. या ईव्हीएमच्या मशीनला छेडछाड केले जाऊ शकते. असे कारण सांगून हे मशीन बंद केले जावे. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक दाद मागत आहेत.
ईव्हीएम मशीनला विरोध कसा करावा? म्हणून आता काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन जनतेमध्ये प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्व लोकांना सुचित करीत आहेत की येत्या लोकसभा व विधानसभा तसेच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघातील लोकांनी 300 ते 400 उमेदवार उभे केले जावेत. जेणेकरून हे ईव्हीएम मशीन व्यवस्थित चालू शकणार नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका या घ्याव्या लागतील. अशी मनोधारणा करून या संघटना आता प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करू पाहत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले आहे. या संविधानामध्ये लोकशाही मध्ये प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढविण्यास उभे राहण्याचे व उमेदवारी अर्ज भरण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे कुणीही व्यक्ती भारत देशामध्ये कुठूनही निवडणुकीला उभे राहू शकतो. हा भारतीय नागरिकाला मिळालेला मूलभूत अधिकार या अधिकाराला अनुसरून संपूर्ण राज्यांमधून तसे देशांमधून जे लोक ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवू इच्छिता या लोकांनी उमेदवारी अर्ज भरून ही ईव्हीएम यंत्रणा कुचकामी करण्यासाठी व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ही निवडणूक बॅलेट पेपर वर घेण्याची वेळ येण्यासाठी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न येत्या लोकसभा विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायत या निवडणुकांमधून होण्याची शक्यता आज संपूर्ण गावागावांमधून चर्चा केली जात असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुका या ईव्हीएम वर होणार की बॅलेट पेपरवर होणार हे येणारा काळच सांगू शकेल.