आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ० ते १८ वयोगटातील बालकांच्या हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन.
पंढरपूर/ प्रतिनिधी
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे लहान बालकांचे हृदयाचे सोनोग्राफी तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी शिवसेनेचे महावीरनाना देशमुख, संजय बंदपट्टे, चंद्रकांत बागल, श्रीकांत बागल, दत्ता भोसले, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सुडके, डॉ. प्रदीप केचे, डॉ. ओंकार पावले, डॉ. आश्विनी शितोळे, डॉ. दीपक धोत्रे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता.
यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पंढरपूर शासकीय रुग्णालयाची पाहणी केली होती.
यानंतर आता सर्व समस्या दूर झाल्या असून एखाद्या खाजगी रुग्णालया सारखी व्यवस्था असल्याने समाधान व्यक्त केले.
आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ० ते १८ वयो गटातील बालकांची हृदयाची तपासणी शिबिर आयोजित करून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने आरोग्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल कौतुक केले.
या शिबिरातील सर्व बालके सुदृढ असाविल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुरुवातीला आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी शासकीय रुग्णालयाचे सर्व डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचारी उपस्थित होते.