पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथील लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे पंढरपूर आय व्ही एफ सेंटरचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पंढरपूर आणि परिसरातील डॉक्टर बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही कारणास्तव एखादी स्त्री आई होऊ शकली नाही तर त्याचे अनेक कारण असू शकतात त्यातील एक कारण म्हणजे वंध्यत्व यामुळे स्त्रीला मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
मात्र आज काळ बदलला आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. महिलांना आई बनण्यासाठी अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. त्यामधील एक म्हणजे आयव्हीएफ उपचार पद्धती या उपचार पद्धतीने जोडप्यांना पालक बनता येते. आयुष्यात मुल असल्याचा अनुभव घेता येतो. यासाठी पंढरपुरातील लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे या आयव्हीएफ सेंटरची सुविधा पंढरपूर तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येत उपलब्ध करून दिली आहे.
या आयव्हीएफ सेंटरची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले, संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, डॉ. सुदेश जोशी, डॉ. रमेश काटकर, डॉ. दिपाली घाडगे डॉ. असलम मुलानी, डॉ. विजय सरडे, डॉ. गिरणार गवळी, डॉ. नेहा रोंगे यांच्यासह पंढरपुरातील डॉक्टर बांधव उपस्थित होते.