लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बंधू भगिनींना मदत निधी वाटप.
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बंधू भगिनींना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत निधी वाटप.
राज्य सरकारच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना द्यावा असा नियम आहे. या नियमानुसार सातत्याने दरवर्षी दिव्यांग बांधवांना मदत निधी देणारी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
विद्यमान सरपंच संजय साठे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,
तसेच सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य रामदास ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकोपयोगी कामाचा सपाटा लावला आहे. गेल्या वर्षी ही मदत निधीचे वाटप करण्यात आले होते. तर चालू आर्थिक वर्षात लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के मदत निधी दिव्यांग बांधवांना दिला आहे. गावातील ८५ दिव्यांग बांधवांना एका छोटेखानी समारंभात सन्मानपूर्वक गुलाब पुष्प व प्रत्येकी तीन हजार रुपये निधी प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच संजय साठे, उपसरपंच महादेव पवार, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार वाघमारे, नागरबाई साठे, औदुंबर ढोणे, आशाबाई देवकते, सागर सोनवणे, रेश्मा साठे, संदीप मांडवे, रोहिणी साठे, समाधान देठे, रूपाली कारंडे, गोवर्धन देठे, सुरेखा खपाले, रुक्मिणी जाधव विजयमाला वाळके, शितल कांबळे, यांच्यासह गावातील दिव्यांग बांधव त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद, महानगरपालिका पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातील 5% निधि हा विविध अपंग / दिव्यांग कल्याणकारी योजना यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य असून तो वेळेत लाभार्थाना वितरित करणे अपेक्षित असताना बऱ्याच वेळा हा निधी वाटप करण्यास टाळाटाल किंवा दिरंगाई केली जाते.
यामुळे आपलं हक्क मागण्यासाठी दिव्यांग बांधव आंदोलनाची भूमिका बजावत रस्त्यावर उतरताना दिसून येतात.ज्यांना हात नाही, पाय नाही, काहींना दृष्टी नाही तर काहींना बोलताही येत नाही अश्या दिव्यांग बांधवानाही आपलं हक्क मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही खूप खेदजनक बाब आहे.पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचा इतर ग्रामपंचायतीनी आदर्श नक्कीच घ्यावा. अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.