पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत भाजपा किसान मोर्चा राज्य सरकारकडे करणार मागणी
पंढरपूर/प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम होत आहे.समृद्धी महामार्ग, रत्नागिरी-नागपूर महामार्ग प्रमाणेच शक्तिपीठ महामार्गासाठी मोबदला मिळावे.यासाठी भाजपा किसान मोर्चा राज्य सरकार सोबत बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी संदीप गिड्डे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, भाजपा किसान मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पूर्व सोलापूर जगन्नाथ गायकवाड, प्रदेश सचिव सोपान नारनवर यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भ,कोकण,पश्चिम महाराष्ट्र, गोवा या विभागातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जात असल्याने या भागातील काही शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी भूमिहीन झाला नाही पाहिजे, भूमीहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्यात यावी, भूमिहीन म्हणून त्यांची गणना करून नोकरीस पात्र ठरवावे, समृद्धी महामार्ग, नागपूर- रत्नागिरी महामार्ग प्रमाणे या शक्तीपीठ महामार्ग मोबदला मिळावा.
अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने वरिष्ठ नेत्यांकडे व राज्य शासनाकडे मांडणार असून यासाठी भाजपा किसान मोर्चा येत्या काही दिवसात राज्य सरकार सोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.