पंढरपूर/प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर निशाणा साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. अनेक जाती आरक्षणापासून वंचित आहेत. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, युवकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. वय उलटून गेले तरी अनेक तरुण लग्नापासून वंचित आहेत. यासाठी पुढील काळात आपण काम करणार आहे. यासाठी वंचित घटकातील उमेदवार म्हणून मला माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली असल्याचे सांगत.
मतदार संघातील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या अनेक जाती समूहाचा मला पाठिंबा असल्याने यश नक्की मिळेल आणि माढा लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला गुलाल उधळण्याची संधी मिळेल असा विश्वास बारसकर यांनी व्यक्त केला.