म्हसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ते संवाद मेळावा संपन्न
पक्षाचा निष्ठावान म्हणून अभयसिंह जगताप यांना उमेदवारी द्यावी कार्यकर्त्यांचा आग्रह
पंढरपूर/ प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड येथे पार पडला.
या संवाद मेळाव्यास आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभिनेते किरण माने, युवक नेते अभिजीत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संवाद मिळाव्यात कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षातील निष्ठावंत अभयसिंह जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की ‘माढ्याच्या उमेदवारी बाबत शरद पवार साहेब घेतील ते धोरण बांधू त्यांच्या घराला तोरण’आणि फक्त तुतारी निवडून आणण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि काम करू असा निर्धार जगताप यांनी केला. ते पुढे बोलताना म्हणाले हा मेळावा पक्षातील आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. पक्षाकडे मी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र सर्वस्वी निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेब आम्हाला विश्वासात घेऊन घेतली. असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की काही दिवसातच माढा लोकसभा मतदारसंघात अभयसिंह जगताप यांनी पक्षाचे मोठे काम उभे केले आहे.
याची दखल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब घेतील असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी काहीही झाले तरी माढ्यात यंदा तुतारीच वाजणार असल्याचा विश्वास व्यक्त करत पक्षाच्या आदेशाने आपण आलो असल्याचे सांगितले.