२८ मार्चला म्हसवड येथे भूमिका जाणून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा मतदारसंघात शिवसेना,राष्ट्रवादी विभागल्याने महायुतीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची संख्या पाहता. निवडणूक लढवण्यासाठी कोणीही पुढे येण्याची शक्यता नसताना या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी काम केले आहे.याबाबत मागील काही दिवसापूर्वी सोलापूर आणि सातारा येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी अभयसिंह जगताप यांना माढ्याची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र काही दिवसापासून पक्षाबाहेरील उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने आमचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत याबाबत आपण पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थकांचा मेळावा २८ मार्च २०२४ रोजी म्हसवड येथे मेळावा आयोजित करणार आला असून येथे व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठ नेते मंडळींपर्यंत पोहोचवणार असल्याचे जगताप यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की राज्यात भारतीय जनता पार्टीकडून पक्ष फोडण्याचे काम झाले आहे. सरकारमध्ये दुसऱ्या पक्षाचे ताकदवान नेते सामील होत आहेत. मात्र या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.
यामुळे राज्यातील जनता भाजपा विरोधात नाराज आहे. राज्यात शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे यांच्या बाबत सहानुभूतीची लाट आहे.
माढा लोकसभा मतदार संघात आश्वासना व्यतिरिक्त कोणतीही विकास कामे न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
यावरून पक्षातील मतभेद दिसून येत आहेत.
महादेव जानकर यांनीही माढ्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर
याबाबत आम्हाला विश्वासात घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.
भाजपाकडून कोणीही उमेदवार असला तरी माढ्याचा उमेदवार हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा द्यावा.
अशी मागणी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत अभयसिंह जगताप यांनी केली.