उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथे इफ्तार पार्टीस राजू खरे यांची हजेरी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करत मोहोळ शिवसेनेचे संभाव्य विधानसभेचे उमेदवार राजू खरे यांच्या विजयासाठी दुआ मागितली.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या आयोजित इफ्तार पार्टीसाठी उपस्थित होते.
यावेळी इफ्तार पार्टी निमित्त खरे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत खजूर, सफरचंद, चिकू, पपई अशा अनेक फळांची मेजवानी मुस्लिम बांधवांना यानिमित देण्यात आली.
यावेळी फिरोज पठाण, शिवसेना सोलापूर जिल्हा सचिव जावेद भाई पटेल, शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, युवासेना तालुकाप्रमुख आकाश गजघाटे, समन्वयक अश्फाक शेख, गटप्रमुख लक्ष्मण राठोड, मुकुंद जांभळे, शाखाप्रमुख केशव गोरे, संजय लंबे, हमीद मुलानी, कचरू मुलानी, शाहीद मुलानी, शेखलाल शेख, जावेद शेख, साकी पठाण, शौकत मुलानी, पीर साहब मुलानी, सलीम शेख, मनोरंजन जाधव, रंगनाथ गुरव, अरुण जाधव, अफसर मुलानी मुस्लिम बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.