गावभेट दौऱ्या दरम्यान अनेक प्रलंबित प्रश्न लावले मार्गी
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे उमेदवार मनसे नेते दिलीप (बापू)धोत्रे यांनी मंगळवेढा तालुक्यात गाव भेट दौऱ्यावर भर दिला आहे. त्यांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. यानिमित्त त्यांनी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गणेशोत्सवच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण कार्यकर्ते जोडण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय गरिबांची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणून मंगळवेढा तालुक्यातील अनेक जेष्ठ मंडळी आणि युवक कार्यकर्तेनी त्यांच्या सोबत चाय पे चर्चा केली आहे.
एवढ नव्हे तर मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गणेशोत्सव मध्ये सहभाग नोंदवत त्यांनी श्री ची पूजा करत आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती देत आहेत.
यामध्ये पंढरपूर शहरातील रस्ते,हिंदू स्मशान भूमी दुरुस्ती,मुस्लिम दफनभूमीतील रस्ते, एन सणासुदीच्या मुहूर्तावर पंढरपूरकरांना टँकरद्वारे पाणी वाटप,MIDC बाबत केलेला पाठपुरावा तसेच महिलांसाठी छोटे-मोठे उद्योग अशा अनेक कामांना उजाळा दिला. यावेळी त्यांनी एकाच वेळी
तब्बल 12 गावात भेटी दिल्या. यामध्ये फटाक्याच्या आतिषबाजीत आणि नागरी सत्कार करत अनेक ठिकाणी धोत्रेंचे स्वागत करण्यात आले. यामध्ये मरवडे,बालाजीनगर,कात्राळ,माळेवडी,हुलजंती,पौर, शिवणगी,सोड्डी,आसबेवाडी,सलगर खुर्द, सलगर बुद्रुक,जंगलगी,रड्डे, सिद्दीनकेरी,येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील दोन दिवसांपूर्वी राहाटेवाडी-तमारर्डी येथील पुलाचे काम मार्गी लावल्यानंतर काल सिद्दीनकेरी येथील ग्रामस्थांनी महिलांसाठी छोट्या-मोठ्या उद्योगासाठी दोन शिलाई मशीनची मागणी केली होती. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी शिलाई मशीन देऊ असे जाहीर केले त्यामुळे अनेक ग्रामस्थ आणि नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे बोलताना म्हणाले आतापर्यंत तुम्ही परिचारक,भालके,आवताडे यांना संधी दिली आता एक गरीब घराण्यातील मुलाला आमदारकीची संधी द्या असे आवाहन केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याची चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे.