घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिताराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरू केला जनतेशी संवाद
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथून सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नियोजित गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली.
यावेळी त्यांनी पंढरपूर,मंगळवेढा परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांसोबत सिताराम महाराज यांचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत हजारो नागरिक उपस्थित होते.यानंतर त्यांनी तपकिरी शेटफळ, तनाळी, तावशी या गावांना भेट दिली.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक, महिला तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी गावातील विविध प्रलंबित विकास कामे लवकरच पूर्ण करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन नागरिकांना केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.पहिल्या दिवशीच्या या गाव भेट दौऱ्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत त्यांचे विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.