जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमास महिलांचा प्रतिसाद
पंढरपूर/प्रतिनिधी
२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या सौभाग्यवती तृप्तीताई खरे यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुक्यातील चळे येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री दर्लिंग प्रशाला व भास्करआप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.समाजसेविका तृप्तीताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तृप्तीताई खरे यांनी सुरुवातीला महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की सर्वत्र महिला सक्षम आहेत जगात महिला कुठे हि कमी नाहीत. डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर, राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या पदावर महिला आहेत. त्यामुळे महिलांनी कुठे स्वतःला कमी समजू नये प्रत्येक महिलाही कलागुणांनी संपन्न असतेच त्यांना आपल्या कलागुणाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते. मुलींनी ही चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे कारण म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आपला अभ्यास वेळेत पूर्ण करावा आणि चांगली मार्क मिळावेत असे आवाहन तृप्ती खरे यांनी आपल्या भाषणातून केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे, यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भुसे मॅडम, यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य जे बी गायकवाड, गोपाळपूरच्या उपसरपंच उज्वलाताईबनसोडे, मा. सरपंच वंदना सोनटक्के, जिजाऊ ग्रामीण महिला पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे, सारिका वाघ, दिपाली गायकवाड, अबिनी वाघ, डॉ. वैशाली गायकवाड, स्मृति मोरे, पुनम मोरे, आर पीआय कार्याध्यक्ष विजय वाघमारे, ज्ञानेश्वर शिखरे, लखन वाघमारे विद्यार्थी आणि महिला शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.