शिवक्रांती संघटनेची श्री विठ्ठल मंदिर समितीकडे मागणी
पंढरपूर/ प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न होत असते यावेळी दर्शन पास दिले जातात. यंदा मानाच्या पालखीतील प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेसाठी पास देण्याचे ठरवले आहे. याच धरतीवर पंढरपुरातीलही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पास देण्यात यावा अशी मागणी शिवक्रांती संघटनेच्या वतीने मंदिर समितीकडे करण्यात आली आहे.
यावेळी शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे, सुमित शिंदे, शनि घुले, शंकर सुरवसे, तात्या जगताप उपस्थित होते.
पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पंढरपूर शहरासाठी व नागरिकांसाठी मोठे कार्य आहे. अनेक वेळा सामाजिक कार्य करत असताना सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो तरीही सर्व संघटनांचे पदाधिकारी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत आहेत. यंदाच्या वर्षी मानाच्या दिंड्यांना महापुजेसाठी पास देण्याचे ठरवण्यात आले आहे. या धर्तीवर पंढरपुरातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन ते चार पास देण्यात यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशी दर्शनाला आले असता घेराव घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवक्रांती संघटनेने मंदिर समितीला दिला आहे.