राजू खरे यांनी मिरवणुकीत गाण्यावर धरला ठेका .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ मतदारसंघातील वडदेगाव,उचेठाण सरकोली या गावांमध्ये शिवसेना नेते राजू खरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
शिवजन्मोत्सव मंडळांच्या आग्रहाखातर राजू खरे यांनी जय श्री रामाच्या गाण्यावर ठेका धरला.
यावेळी गावागावात शिवसेना नेते राजू खरे यांचा हलगीच्या सुरात व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत अन् सत्कारही करण्यात आला.
यानंतर उचेठाण येथे संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर या वस्तीवर आतापर्यंतच्या इतिहासात या गावात कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार न आल्याचे स्थानिक नागरिकांनी अडीअडचणीच्या समस्या मांडल्या,खरे यांनी त्या समस्या तत्काळ सोडविण्यात येणार असल्याचा विश्वास उपस्थित ग्रामस्थांना दिला.
यानंतर सरकोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक खरे यांनी सहभाग घेऊन ग्रामस्थांच्या आग्रहाखातील डीजेच्या गाण्यावर ठेका धरला.