पंढरपूर येथील नेहतराव कुटुंबीयांचा उपक्रम
पंढरपूर /प्रतिनिधी
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आलेल्या वारकरी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन संतोष नेहतराव यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली ४० वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाची सुरुवात दिनांक १६ जुलै पासून
येथील केबीपी कॉलेज, हॉटेल लक्ष्मी पॅलेस समोर करण्यात आले आहे. पाच लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर येथे महाप्रसाद वाटपाची परंपरा ४० वर्षांपासून नेहतराव कुटुंबीय जोपासत आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्याची परंपरा चाळीस वर्षांपूर्वी बाबुराव नेहतराव यांनी माऊलीच्या पालखीच्या प्रस्थान वेळी पुणे येथील विश्रांतवाडी येथून सुरू केली ती परंपरा पुढे वाखरी पालखीतळ येथे वसंतराव नेहतराव यांनी जोपासली आणि आता के.बी.पी कॉलेज, हॉटेल लक्ष्मी समोर संतोष नेहतराव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करून ही परंपरा संतोष नेहतराव यांच्यासह चौथी पिढी जपत आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या महाप्रसाद कार्यक्रमात पाच लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. अशी माहिती नगरसेवक संतोष नेहतराव यांनी दिली. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी माजी नगरसेवक संतोष नेहतराव, माजी नगरसेवक बाळासाहेब नेहतराव, माजी नगरसेवक सुरेश नेहतराव, राजू नेहतराव, निखिल नेहतराव,अनिकेत नेहतराव,सोहम नेहतराव,विश्वतेज नेहतराव,तनिष्क नेहतराव हे परिश्रम घेत आहेत.