युवराज मुचलंबे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम…..
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती युवराज मुचलंबे मित्र परिवाराच्या वतीने येथील दाळे गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमूख उपस्थित म्हणून पंढरपूर-मंगळवेढाचे युवक नेते प्रणव परिचारक यांनी हजेरी लावली होती.
यावेळी समाजसेवक युवराज मुचलंबे यांनी जेष्ठ नागरिक, युवक वर्ग,आजी-माजी नगरसेवक,समाजसेवक यांना सोबत घेऊन एकीचे दर्शन दाखवले तसेच पंढरपूर शहरात लवकरात लवकर महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारावे यासाठी परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
यावेळी युवक नेते प्रणव परिचारक,भारत भिंगे,आप्पासाहेब मुचलंबे, संजयआप्पा भिंगे,नगरसेवक लखन चौगुले,नगरसेवक अंबादास धोत्रे, विकास टाकणे,नगरसेवक महेश साठे,सागरदादा यादव, संतोष अलंकार, मयूर भिंगे, शिवकुमार जवळे, एडवोकेट आनंद उंबरे, माऊली म्हेत्रे उपस्थित होते.
अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात, असे सांगितले जाते.
धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते.
बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली त्यांची आज 893 वी जयंती समाजसेवक युवराज मुचलंबे मित्रपरिवार यांनी सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.