मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्याकडून न्याय हक्कासाठी मुंबई येथे जाणाऱ्या नाभिक समाज बांधवांसाठी ट्रॅव्हल्सद्वारे जाण्याची सोय
पंढरपूर/प्रतिनिधी
राज्यातील सकल नाभिक समाजाने संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई येथे एक दिवशी राज्यव्यापी महाधरणे आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनास पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाज बांधवांना मुंबई येथे जाण्यासाठी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी येथील शेकडो बांधवांना ट्रॅव्हल्सद्वारे जाण्याची सोय करून दिली आहे.
समाजाच्या न्याय हक्कासाठी मुंबई येथे जाण्यासाठी गाडीची सोय करून दिल्याबद्दल रविवारी रात्री मंगळवेढा येथील नाभिक समाज बांधवांनी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचे आभार मानून सत्कार केला.
यावेळी दिलीपबापू धोत्रे यांनी श्री संत दामाजीपंत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅव्हल्सचे पूजन केले. यानंतर पंढरपूर येथील संत सेना महाराज मठ येथून मुंबईकडे जाणाऱ्या नाभिक समाज बांधवांना शुभेच्छा देऊन ट्रॅव्हल्सचे पूजन केले.
यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचे नाभिक समाज बांधवांकडून फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर शेकडो नाभिक समाज बांधव मुंबईकडे ट्रॅव्हल्सने रवाना झाले.