पंढरपुरात भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरात पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यांच्या पदयात्रा आणि कॉर्नर सभांना पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
रविवारी महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरात भव्य पदयात्रेचा शुभारंभ शेटे पेट्रोल पंप येथून करण्यात आला.
ही पदयात्रा पुढे ज्ञानेश्वर नगर, बोहरी पंप,भोसले चौक,संत कैकाडी महाराज मठ,श्री भगवती देवी मंदिर,अनिल नगर,भूयाचा मारूती,काशीकापडी गल्ली,रामबाग १९७ ब, सातारकर मठ,गोविंदपुरा,बाराभाई चौक,क्रांती चौक,जय भवानी चौक,हनुमान मैदान,अर्बन बँक,भादुले चौक,नाथ चौक,गांधी रोड,चौफाळा या मार्गावरून काढण्यात आली होती.
सदर प्रसंगी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.