जागतिक महिला दिनानिमित्त वरद विनायक हॉस्पिटल,लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम निमा वुमन्स फोरमचा उपक्रम
पंढरपूर /प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. मनोज भायगुडे आणि तेजश्री भायगुडे यांच्या संकल्पनेतून विनायक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम निमा वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर मधुमेह रक्तदाब ईसीजी असणे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉक्टर राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ.सीमाताई परिचारक, सौ रोहिणीताई भोसले, सौ.साधनाताई भोसले, मंगलताई शहा त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थित महिलांना स्त्री रोग तज्ञ डॉ. सुजाता गुंडेवार, कॅन्सर तज्ञ डॉ. अमित इनामदार यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन नेत्ररोग तज्ञ डॉ.मनोज भायगुडे,फाउंडर प्रेसिडेंट आर्वी कॉम्प्लेक्स, वरद विनायक हॉस्पिटल मंगल ज्योती नेत्रालय सौ.तेजश्री भायगुडे, लायन्स क्लब अध्यक्ष ललिता कोळवले-जाधव, लायन्स क्लब अध्यक्ष आरती बसवंती, निमा वूमन्स फोरम अध्यक्षा डॉ. संगीता कानडे यांच्यावतीने करण्यात आले होते.तसेच डॉक्टर संग्राम गायकवाड,डॉक्टर सुदेश जोशी,डॉक्टर एम आर टकले, डॉक्टर अजित जाधव,डॉक्टर सुनील पवार,डॉक्टर प्रवीण बाबर तसेच वरदविनायक हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी सदस्य मान्यवर यांनी हजेरी लावली होती पंढरपूर शहरातील गोरगरीब महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्याचा हातभार लागावा यासाठी वरद विनायक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पंढरपूर डॉक्टर मनोज भायगुडे आणि तेजश्री भायगुडे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने पंढरपूर शहरातून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे तसेच भविष्यात देखील असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेची सेवा करू असे आश्वासन वरदविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर मनोज भायगुडे यांच्याकडून देण्यात आले आहे