मुलाचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले; खूप आनंद वाटत आहे; या माध्यमातून जनतेची सेवा करावी; आ. खरे यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्या भावना
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर येथे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजू खरे यांच्या आई वडिलांचा सन्मान पंढरपूर येथील जुना कराड नाका येथे स्व. महादेव भालेराव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
राज्याचा नवनिर्वाचित आमदारांचे सत्कार होत असताना पंढरपुरात एक आगळा वेगळा सत्कार पार पडला.
ऐतिहासिक विजय संपादन केलेले मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांचे वडील ज्ञानू खरे व आई कांताबाई खरे यांनी खूप हालाकीच्या परिस्थितीतून वडिलांनी टांगा चालवून आपल्या मुलाला घडवले. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा यासाठी आ.खरे यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आ.राजू खरे यांच्या आई-वडिलांनी सांगितले की अनेक दिवसांपासून त्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. आमचा मुलगा आमदार झाला. आम्हाला खूप आनंद झाला आहे. पुढील काळात त्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे. जनतेची सेवा करावी. आशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
याप्रसंगी अण्णा ठोकळे, ऋषिकेश भालेराव, राहुल चंदनशिवे,अनिल शिवशरण, गौतम भालेराव, पोपट क्षीरसागर, दीपक साबळे, राजाभाऊ सर्वगोड, विवेकानंद रिकेबे,लालचंद ढवळे, अनिल ढवळे, संजय शिवशरण, राजू कांबळे, अशोक चव्हाण, राजू ठोकळे, पंडित ढवळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.