राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे. पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सूचनेनुसार पंढरपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त आज पंढरपूर येथील यमाई तलाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या उपस्थितीमध्ये तर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्ठांन भोजन, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप आदी सामाजिक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून पार पडले.
यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, शहर कार्याध्यक्ष सुनील जाधव, रशीद शेख, संचालक सुनील पाटील, तालुका सचिव अंकुश चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे, राष्ट्रवादी विद्यार्थी माढा तालुका उपाध्यक्ष रमेश गुटाळ पाटील, संजय सातपुते, श्रीधर सातपुते, कुमार बिडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.