प्रतिनीधी /खटाव
माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा.धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी आपल्या खटाव औंध येथे महिला मेळाव्यात माता भगिनींना संबोधन केले.
धैर्यशिल मोहिते-पाटील संबोधन करताना म्हणाले केंद्र शासनाच्या उद्योगपती धार्जिण धोरणांमुळे महागाई वाढवून सर्वसामान्य कंबरडे मोडले आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत २०१४ ला ४१० रुपयाला एका सिलेंडरची किंमत होती.आज तोच सिलेंडर ११०० रुपयांना आहे.घरातील प्रमुख महिला जी आपले घर सांभाळत असते त्या माता भगिनीं महिलांना आपले प्रपंच चालवण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.
आपल्याला उद्योगधार्जींण सरकार घालवून देशात व राज्यात सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. यासाठी तुतारी वाजवणारा माणूस यांचे समोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी महिला मेळाव्यात माता भगिनींना केले.
यावेळेस मदनसिंह मोहिते पाटील,रणजीत देशमुख,अनिल देसाई, विवेक देशमुख, संजय भोसले,विजय शिंदे ,शहाजीराजे भोसले, शिवसेना(उ.बा.ठा) महिला तालुकाध्यक्ष सलमा शेख, बाबा गोसावी संजय भोसले मार्तंड इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.