भगीरथ भालके यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा
पंढरपूर/प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले. भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले.
यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला.