सोलापूर/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर ‘मुद्द्याचं बोला ओ’ हे रॅप सॉंग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या इंस्टावरून पोस्ट केलेल्या या रॅप साँग मध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई, बेरोजगारी, स्मार्ट सिटी, विमानतळ, आय टी पार्क, पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.
तसेच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या १० वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळालं? ह्याचं उत्तरच मिळत नाहीये. सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याकडेच जोर देताना दिसत आहेत. त्यामुळेच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉंगच्या माध्यमातून प्रश्न , “मुद्द्याचं बोला ओ!” म्हणत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहे.
प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोला ओ हे रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.