प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या ट्रॅक्टर्स शोरुमचे शानदार उद्घाटन
पंढरपूर/प्रतिनीधी
देशाचे नेते, माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी आजवर निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीशी उभारून कार्यकर्त्यांना बळ देण्याचाच प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणेच मागील अनेक वर्षापासून निष्ठावंत शिलेदार म्हणून काम करीत असलेले, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून या व्यवसायासाठी शुभेच्या दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या फाटे ट्रॅक्टर्स या न्यु हॉलंड ट्रॅक्टर्स शोरूमचा उद्घाटन समारंभ देशाचे माजी कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला आहे .यापुढेही वेगवेगळे व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
या उद्घाटन कार्यक्रमाचे वेळी राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्राहक सेलचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी,
विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड गणेश पाटील, राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मयूर काळे,शहराध्यक्ष संपन्न दिवाकर,जिल्हा परिषदचे माजी सदस्य सी पी बागल, विजय प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडेकर, पंढरपूरचे माजी नगरसेवक किरण घाडगे, उद्योजक जयसिंग गोरे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष राजश्रीताई ताड, बोहाळी चे सरपंच शिवाजी पवार, कोर्टी गावचे सरपंच राजू पवार, न्यू हॉलंड कंपनीचे एरिया मॅनेजर गणेश निंबोरे, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या शोरुमचे उद्घाटन प्रसंगी सुधीर भोसले, स्वप्नील जगताप, संतोष पाटील,बाबा हाके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, , शिवाजीराव जाधव, अर्जुन सावंत,महेश येडगे, जालिंदर कुसुमडे, अब्दुल मणेरी पाटील, दत्ता दहीवडकर, संजय काळे,प्राचार्य राजेंद्र रेपाळ, डॉ कर्मजित डोंगरे, आण्णासो नागटिळक, संचालक बाळासाहेब हाके, योगेश ताड, रवी शिंदे, गोरख बागल, संजय पवार, आण्णासो चव्हाण, गणेश सुर्यवंशी, चंद्रकांत काळे, दिपक येळे, बाळासाहेब बागल, ताऊ डोंगरे, अभिमान काळे, ऍड तरटे, धनंजय बागल, रोटोकिंग रोटावेटरचे समिध धामुरे, प्रभाकर बागल,उद्योजक बबन सावंत, सुभाष बागल, उद्योजक डी बिल्डर, डॉ हणमंत नागने, गणेश बागल, सर्जेराव पवार, बाजीराव बागल, धनाजी गुंड पाटील, रामभाऊ बागल,गुलाब मुलांनी, शुभम पवार, नेहरू बागल, प्राचार्य शिवाजीराव बागल,कांतीलाल फाटे, गणेश फाटे, स्वागत फाटे, पपू फाटे, दत्ता फाटे, आण्णासो फाटे,ओंकार फाटे, बाळू फाटे, नवल फाटे, यांचेसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखयेने उपस्थित होते .
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार नागेश फाटे, डॉ रमेश फाटे, उमेश फाटे, शरविन फाटे, शशांक फाटे यांचे हस्ते करण्यात आले.
साहेबांचे पदस्पर्शाने झालो धन्य..!
आम्ही खा. शरद पवार यांचे पाठीशी कायम राहिलो आहे, यापुढेही राहणार आहे. कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणून खा. पवार यांची पक्की ओळख आहे . त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपली राजकीय आणि उद्योजक म्हणून वाटचाल सुरू आहे . या नव्याने सुरू केलेल्या व्यवसायासाठी स्वतः पवारसाहेब शब्द दिल्याप्रमाणे उपस्थित राहिले यामुळे पवारसाहेब यांच्या पदस्पर्शाने अक्षरशः आम्ही धन्य झालो. आशी प्रतिक्रिया नागेश फाटे यांनी यावेळी दिली आहे .