फलटण येथील मेळाव्यात रामराजे निंबाळकर यांनी भूमिका केली स्पष्ट
पंढरपूर /प्रतिनिधी
माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा मेळावा फलटण येथे गुरुवारी आमदार रामराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी आमदार रामराजे निंबाळकर यांनी समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी समर्थकांनी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर रोष व्यक्त करत. पक्षाने उमेदवार बदलावा.
संजीवराजे निंबाळकर यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
अन्यथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी. अशी आक्रमक भूमिका समर्थकांनी मांडली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रामराजे निंबाळकर यांनी भाजपा उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी सत्तेचा दुरुपयोग करत दहशतीचे राजकारण केले आमच्या कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. भाजपाने उमेदवार बदलावा अशी भूमिका घेतल्याने युतीतील वरिष्ठ नेत्यांनी नाराजी दूर करण्यासाठी बैठक बोलावून चर्चा करण्यात आली.
यावेळी आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करून निर्णय नेत्यांना कळविल्याने कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्ही निर्णय घ्यावा तो निर्णय मान्य असल्याचे हात वर करून सांगितल्याने काही दिवसात कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत शिष्ट मंडळाच्या माध्यमातून पोचवल्या जातील.
याबाबत कोणताही तुतारी चिन्हही घेणार नाही आणि पक्ष बदलला जाणार नाही येत्या दोन दिवसात आमच्या पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी संपर्क साधून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.